Wednesday, 22 May 2019

देशसेवा हीच ईश्वरसेवा

देशसेवा हीच ईश्वरसेवा

                                              
" देश हीच माता ,देश जन्मदाता 
       घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता "


                              देशसेवा हीच ईश्वर सेवा हे म्हणणे सोपे असले तरी , सर्वांसाठी साधारण कार्य नव्हे .माणूस जन्माला आला कि जगण्यासाठी  कमावतो आणि पोटाची अग्नी शमवतो . अनेक सामाजिक सुधारकांनी देशसेवा केली उदाहरण घायचे झाले तर भगतसिंग ,राजगुरू आणि सुखदेव आणि तर देशासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले . महात्मा गांधी ,बाबासाहेब आंबेडकर ,लोकमान्य टिळक ,ज्योतिबा फुले ,सावित्री फुले अश्या अनेक सामाजिक सुधारकांच्या अविरत प्रयात्नामुळे समाजात  कार्याला सुरुवात झाली .

                               देश सेवा हीच ईश्वर सेवा याचा अर्थ देशाची सेवा बॉर्डर वर जाऊन करणे असा काढला जातो पण प्रत्येक छोट्या गोष्टीतून आपण एक प्रकारे देश सेवा करू शकतो . हळूहळू ईश्वर सेवा काय आहे हे लोकांना कळेलच पण खरी सेवा कशात आहे हे कळणे गरजेचे आहे . भुकेलांची भूक ओळखावी, गरजवंताची गरज ओळखावी, उत्कर्षासाठी जी मदत करता येईल ती करावी. आज आपण दररोजच्या जीवनात अनेक अंध ,अपंग ,निराधार ,गरजू पीडित या शोषित लोकं आपल्या आजूबाजूला पाहत असतो . खरंतर या लोकांना मदतीची नितांत गरज असते .आपण यांच्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो या नको तिथे पैसे खर्च करतो . हे सर्व करण्यापेक्षा या लोकांची सेवा आपण करू शकतो त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो . त्यांचा  हसरा या समाधानी चेहरा पाहिला कि खूप आनंद वाटतो , यामुळे आपण देशसेवा केल्याचे समाधान आपल्याया मिळून जाते .यातूनच खरा ईश्वर आपल्याया मिळतो .

                             समाजातील अंधश्रद्धारूपी अज्ञात , अंधकार दूर करण्यासाठी गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,स्वामी विवेकानंद अश्या अनेक थोरांनी मानवता हीच ईश्वरसेवा आहे, देव देवळात नाही ,तर माणसात आहे ,हे सांगण्याचा प्रयन्त केला. आपण वेगळ्या जातीचे आहोत असं न मानता मानवता हाच धर्म आहे असं समजून जर निस्वार्थ मानाने देशसेवा केली तर आयुष्यात काहीच कमी पडणार नाही कारण ,

           

  देशसेवा हीच ईश्वर सेवा आहे.  

                                                                                                                                धन्यवाद !